जो मै बोलता हू.. ओ मै 100 % करता हू… शेकाप खजिनदार प्रितम म्हात्रे

-

जो मै बोलता हू.. ओ मै 100 % करता हू… शेकाप खजिनदार प्रितम म्हात्रे

 

करंजाडे सेक्टर 3 येथील सोसायटी गार्डनमध्ये बसविलेल्या संरक्षण जाळीचे उदघाटन

 

जे.एम. म्हाने चॅरिटेबल संस्था यांच्या निधीतून साकारले संरक्षण जाळी

 

 

पनवेल/प्रतिनिधी — करंजाडे वसाहतीतील सेक्टर 3 येथील सोसायटीकडून तयार करण्यात आलेल्या गार्डनला रहिवासी यांच्या मागणीनुसार जे.एम. म्हाने चॅरिटेबल संस्था यांच्या निधीतून संरक्षण जाळी बसविण्यात आली आहे. त्याचे उदघाटन शेकाप खजिनदार प्रितम म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवारी करण्यात आले. यावेळी नागरिकांच्या मागणी नुसार संरक्षण जाळी बसविली त्यावेळी जो मै बोलता हू वही मै करता हू असे प्रितम म्हात्रे यांनी सांगितले.

 

 

करंजाडे वसाहतीमधील सेक्टर 3 परिसरातील सोसायटीच्या नागरिकांनी एकत्र येत इमारतीच्या बाजूला गार्डन तयार केले आहे. यामध्ये अनेक प्रकारच्या वृक्षाची लागवड केली आहे. याची निघा सोसायटीवासिय राखत आहेत. मात्र या गार्डन ला सरक्षित जाळीची मागणी माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्याकडे केली होती. त्यानुसार आंग्रे यांनी शेकाप खजिनदार प्रितम म्हात्रे यांना या मागणीबाबत सांगितले. त्यानुसार तात्काळ या गार्डन जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था यांच्या माध्यमातून सरक्षित जाळी बांधण्यात आली. त्यांचे उदघाट्न बुधवारी लोकांच्या मनातील आमदार शेकाप चे जिल्हा खजिनदार प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी करंजाडे वसाहतीच्या समस्याबाबत लवकरच सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक लावून येथील प्रश्न, समस्या सोडविण्याचे प्रयत्न करणार असे म्हणत जो मै बोलता हू.. ओ मै 100 % करता हू…असे प्रितम म्हात्रे यांनी बोलताना सांगितले. यावेळी माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

[avatar]