पनवेलकरांनी आपले प्रेम आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावरच असल्याचे दाखवून दिले – माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर 

-

पनवेलकरांनी आपले प्रेम आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावरच असल्याचे दाखवून दिले – माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर 

 

 

कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर हे पनवेलच्या विकासाचे शिल्पकार आहेत

 

 

पनवेल (प्रतिनिधी) — पनवेलच्या विकासासाठी दिवसरात्र एक करून काम करणारे महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुन्हा एकदा आणि सलग चौथ्यांदा दणदणीत विजय मिळवत विजयाचा चौकार मारला. यावेळी या विजयाने मतदार संघातील पनवेलकरांनी आपले प्रेम आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावरच असल्याचे दाखवून दिले असे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले.

 

 

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या विजयाबद्दल अगोदरच खात्री दिली होती. आमदार प्रशांत ठाकूर सहज निवडून येतील असा त्यांनी जाहीर दावा केला होता. तो शब्द आणि शब्द तंतोतंत या निकालाच्या रूपातून खरा ठरला. या विजयाने मतदार संघातील जनतेने पुन्हा आपले प्रेम आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावरच असल्याचे दाखवून दिले. पनवेल विधानसभा मतदार संघ हा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मतदार संघ आहे. ६ लाख ५२ हजार ६२ मतदार संख्या असून ३ लाख ८२ हजार ३३५ मतदारांनी मतदान झाले. अपक्षेनुसार सर्वाधिक मते मिळवत आमदार प्रशांत ठाकूर दणदणीत विजय मिळविला. कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर हे पनवेलच्या विकासाचे शिल्पकार आहेत. त्यामुळे त्यांचा विजय नक्की असल्याचा स्पष्ट मत जाणकारांनी व्यक्त केला होता. महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पनवेलची जनता हितचिंतक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आणि हा विजय सहज केला. या विजयाच्या निमिताने कार्यकर्ते आणि पनवेलच्या तमाम जनतेने जल्लोष करत आणि पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला. पनवेलध्ये फटाक्यांची आतषबाजी आणि ‘एकच वादा प्रशांतदादा’ असा जयघोष सर्वत्र पहायला मिळत होता.

 

 

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना १ लाख ८३ हजार ९३१ मते मिळाली त्यांनी ५१ हजार ९१ मतांची आघाडी मिळवत बाळाराम पाटील आणि इतर विरोधकांचा दारुण पराभव केला. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या लीना गरड(४३९८९), मनसेचे योगेश चिले (१०२३१), लोकमुद्रा जनहित पार्टीचे कांतीलाल कडू (२४२९), रिप्लब्लिकन सेनेचे संतोष पवार (१७२९), बहुजन समाज पार्टीचे गजेंद्र अहिरे (१५२६), डिजिटल ऑर्गनायझेशन ऑफ नॅशन पार्टीचे वसंत राठोड (१०३८), भारतीय जन सम्राट पार्टीचे पवन काळे (४७७) , तर नोटाला ३९०५ मते पडली. दरम्यान या निवडणुकीच्या अनुषंगाने विरोधकांनाही अपप्रचाराचे रान उठवले होते. मात्र शेवटी पनवेलच्या विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेली विकासकामे आणि सामाजिक बांधिलकी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांची मेहनत कामी आली आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

[avatar]