अज्ञात चौकडीने तीक्ष्ण हत्याराने एका इसमाची केली हत्या

-

अज्ञात चौकडीने तीक्ष्ण हत्याराने एका इसमाची केली हत्या

 

पनवेल जवळील उसर्ली येथे घडली आहे : अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके रवाना

 

पनवेल, दि.19 (संजय कदम) — अज्ञात चौकडीने तीक्ष्ण हत्याराने एका इसमाची हत्या केल्याची घटना पनवेल जवळील उसर्ली येथे घडली आहे.

 

विजय कळसे (27 रा.मानखुर्द) याची चार अज्ञात इसमांनी अज्ञात कारणावरुन तीक्ष्ण हत्याराने त्याच्या छातीच्या डाव्या बाजूला भोसकून त्याची हत्या केली आहे. त्यानंतर हे संशयित इसम पसार झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक भगत आदींच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रियांका शिंदे व पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. या संदर्भात अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके रवाना झाली आहेत.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

[avatar]