खारघर येथील सराफाला बंदुकिचा धाक दाखवुन, हवेत गोळीबार करणा-या चार दरोडेखोरांना गुन्हे शाखेकडून अटक..

-

खारघर येथील सराफाला बंदुकिचा धाक दाखवुन, हवेत गोळीबार करणा-या चार दरोडेखोरांना गुन्हे शाखेकडून अटक..

 

नवी मुंबई गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई : उदयपुर, राजस्थान येथुन अटक व दोन अग्निशस्त्रे, ३ जीवंत काडतुसे व दरोड्यातील मु‌द्देमाल हस्तगत

 

नवी मुंबई/प्रतिनिधी — खारघर पोलीस ठाणे, गु.रजि. नं. २५७/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३११,१०९,३०९ ४६ सह कलम ३,२५ भारतीय हत्यार कायदा हा गुन्हा दिनांक २९/०७/२०२४ रोजी दाखल आहे. गुन्हयातील फिर्यादी यांचे मालकीचे बी.एम. ज्वेलर्स सेक्टर नं. ३५ खारघर, नवी मुंबई याठिकाणी ज्वेलर्सचे दुकानात ३ हेल्मेट परिधान केलेल्या अनोळखी इसमांनी रात्रौ १०.०० वा. सुमारास जबरदस्ती घुसुन अग्निशस्त्राचा धाक दाखवून, दुकानातुन एकूण ११,८०,०००/- रूपयाचे सोन्याचे दागिने लुटले व फिर्यादी यांनी मदती करता ज्वेलर्सचे दुकानातील अलार्म वाजवले असता दुकानाचे बाहेर आरोपींना पकडण्यासाठी नागरीक जमा झाले असता दरोडेखोरांनी हवेत गोळीबार करून दुचाकी वरून तीनही आरोपी पळून गेले इत्यादी मजकुराच्या तक्रारी वरून खारघर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे.

 

नवी मुंबई पोलीस आयुक्त, मिलींद भारांबे, पोलीस सह आयुक्त,  संजय ऐनपुरे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, दिपक साकोरे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, अमित काळे, याचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचे घटनास्थळास मा. सपोआ, अजयकुमार लांडगे, गुन्हेशाखा यांचेसह मध्यवर्ती कक्षाचे वपोनि सुनिल शिंदे, वपोनि हनीफ मुलाणी कक्ष ३, मध्यवर्ती व कक्ष-३ चे अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचे घटनास्थळास तात्काळ भेट देवून गुन्हयातील पाहीजे आरोपी येण्याचे व जाण्याच्या मार्गा वरील सीसीटीव्ही फुटेजची ८ दिवस पाहणी केली त्यानंतर तांत्रिक तपासाव्दारे गुन्हयातील ४ आरोपी निष्पन्न झाल्याने गुजरात राज्यातील सुरत, राजस्थान राज्यातील उदयपुर व रायगड जिल्हातील नेरळ, माथेरान याठिकाणी वेगवेगळी पथके पाठवुन गुन्हे शाखेचे सपोनि / तुंगेनवार , पोउपनि/आकाश पाटील, पोहवा / सचिन धनवटे, पोहवा / विश्वनाथ पांचाळ, पोना / २८३३ सचिन टिके, पोना/२८८३ निलेश किंद्रे, पोना/सुधीर पाटील यांनी उदयपुर, राजस्थान येथुन खालील नमुद आरोपींना शिताफिने ताब्यात घेवुन तपासिक अधिकारी यांनी आरोपींना नमुद गुन्हयात अटक करून मा. न्यायालयाकडून दिनांक २२/०८/२०२४ पर्यंत पोलीस कोठडी प्राप्त केली आहे. सदर गुन्हयाचे तपासात आरोपींता कडून गुन्हयात वापरण्यात आलेली २ अग्निशस्त्रे, ३ जीवंत काडतुसे, गुन्हा करताना वापरलेली मोटार सायकल व गुन्हयात चोरीस गेलेली मालमत्ता हि नागपाडा मुंबई येथुन हस्तगत करण्यात आली आहे.

 

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे :-

 

१) मो. रिझवान मो. अलीशेख वय २७ वर्षे रा. सदरपुरा, चदंन सोसायटी, खान बेकरीजवळ, सुरत राज्य गुजरात

 

२) अझरुद्दीन हुसनोदीन शेख वय २८ वर्षे रा. कादरसा की नाल, नानपुरा, १५८३ सुरत, राज्य गुजरात ३) ताहा तनवीर परवेझ सिंधी वय २१ वर्षे रा.१०/१६, नार्थ सुंदरदास, आमीन मंजिल, कैलास पान जवळ, उदयपुर राजस्थान

 

४) राजविर रामेश्वर कुमावत वय २० वर्षे रा. ७२, नेहरू बझार, उदयपुर राजस्थान

 

वरील नमूद आरोपीत यांना दिनांक १६/०८/२०२४ रोजी अटक करण्यात आले आहे. तसेच दिनांक २२/०८/२०२४ पावेतो पोलीस कस्टडी घेण्यात आली आहे.

 

आरोपींकडून हस्तगत मालमत्ता..

 

गोल नेकलेस हार पिवळया धातुचा, गळयातील हार पिवळया धातुचा, पिवळया धातुचे पॅन्डल धातुचा , पिवळया धातुचे गोप चैन, पिवळया धातुचे गोल हारपिवळ्या धातुत्ते गोल आकाराच्या बांगड्या एकुण ७ नग पिवळ्या धातुचे गोल ब्रेशलेट, पिवळया धातुचे काळे मणी असलेले मंगळसुत्र, पिवळया धातुचा गोल आकाराचा हारपि, वळया धातुचे गोप असलेली चैन, पिवळया धातुचे काळे मणी असलेले २ वाटीचे मंगळसुत्र १ नग ,पिवळया धातुचे गळयातील हार तुटलेला, पिवळया धातुची माळ,पिवळया धातुचे तुटलेले छोट मनी

 

अग्निशस्त्राबाबत माहीती..

 

१) कन्ट्री मेड बनावटीचे -२ अग्निशस्त्र मॅगझीन, जीवंत काडतुस

गुन्हयात वापरलेली वाहने –

अॅक्सेस स्कुटी –

गुन्हयात आजपावेतो एकुण ७,५०,०००/- रू किंचा एकुण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

 

या पथकाने केली कारवाई 

 

कामगिरी करणारे पोलीस पथक सदरची कामगिरी ही मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. अजयकु‌मार लांडगे, यांचे मार्गदर्शनाखाल मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे, वपोनि गुन्हेशाखा कक्ष ३ श्री. हनीफ मुलाणी, सपोनि / एकनाथ देसाई, सपोनि संतोश चव्हाण, सपोनि/सुरज गोरे, पोउपनि/देवकते, पोउनि/राहुल भदाने, सफौ. मंगेश वाट, अनिल यादव, पोहवा/राजेश मोरे, पोहवा/दुधाळ, पोहवा/सांवत, पोहवा / जोशी, पोहवा/तांदळे, पोना/सतिष चव्हाण, पोशि/अशोक पाईकराव इंटरसेप्शनचे पोहवा / तांडेल, पोशि/ढगे नवी मुंबई यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा तपास कक्ष ३, गुन्हे शाखा, नवी मुंबई हे करीत आहेत.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

[avatar]