राजस्थान येथील अपहरणासह खुनाच्या गुन्हयातील दोन वर्षापासुन पाहीजे आरोपीला पनवेल शहर पोलीसांनी केल गजाआड..

-

राजस्थान येथील अपहरणासह खुनाच्या गुन्हयातील दोन वर्षापासुन पाहीजे आरोपीला पनवेल शहर पोलीसांनी केल गजाआड..

 

पनवेल शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई 

 

                              रवींद्र गायकवाड 

 

राजस्थान राज्यातील जिल्हा करोली मध्ये असलेल्या टोडाभिम पोलीस ठाण्यामध्ये दिनांक १४/०७/२०२२ रोजी दाखल गु. रजी. नंबर २८८/२०२२ भादवि कलम १४३, ३२३, ३४१, ३६५, ३३६, ५०६, ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयातील फिर्यादी हरकेश भरतलाल मिना वय ३६ वर्ष, यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे एकुण आठ आरोपीत यांनी फिर्यादी व गुन्हयातील मयत रतनलाल मिना रा. मधोपुरा यांचे अपहरण करून त्यांचा मारहाण केली तसेच त्यांचे दुचाकी वाहनास जाणुनबुजुन धडक देवुन मयत रतनलाल मिना यांच्या मृत्युस कारणीभुत झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

नमुद गुन्हयातील पाहीजे आरोपीत लोकेशकुमार गिरीराजप्रसाद मिना हा गुन्हा घडल्यापासुन त्याचे अस्तीत्व लपवुन होता. आरोपीतच्या शोधासाठी राजस्थान येथील जिल्हा विशेष पथकाचे (DTS) अंमलदार एएसआय/बहादुर सिंग, कॉन्स्टेबल धारासिंग मिना, कॉन्स्टेबल धनसिंग मिना यांनी सदर आरोपीत याचे तांत्रिक तपासावरून त्याचे अस्तीत्व पनवेल परीसरात असल्याचे निष्पन्न झाल्याने पनवेल शहर पोलीस ठाणे येथे येवुन आरोपीत शोधासाठी पोलीस मदत मागितल्याने पोलीस पथक तयार करण्यात आले. सदर पथकाने आरोपीत याचे प्राप्त लोकेशन नवी मुंबई नियोजित विमानतळ परीसरात येथे आढळून आल्याने सदर ठिकाणी जावुन कामगार तसेच सिक्युरीटी गार्ड सारखा वेश करून सुमारे दहा हजार कामगारांमधुन कौशल्यपुर्ण शोध घेवुन यातील आरोपीत नामे लोकेशकुमार गिरीराजप्रसाद मिना, वय य- ३६ वर्ष, रा. गाव पाडली खुर्द, ता. तोडाभिम, नि.गंगापुर, राज्य राजस्थान यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता त्याने गुन्हयाची कबूली दिल्याने त्यास अटक करून सदर आरोपीत याचे टन्झीट रिमांड मा. प्रथमवर्ग न्यायालय पनवेल यांच्याकडुन प्राप्त करून पुढील कारवाई करीता राजस्थान येथे नेण्यात आले आहे.

 

 

या पथकाने केली कारवाई 

 

 

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, नवी मुंबई श्री. मिलींद भारंबे, पोलीस सहआयुक्त, नवी मुंबई श्री. संजय एनपुरे मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०२, नवी मुंबई श्री विवेक पनसरे, मा. सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग, नवी मुंबई श्री. अशोक राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल शहर पोलीस ठाणे, नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक गुन्हे, पनवेल शहर पोलीस ठाणे, श्री. बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक प्रशासन, पनवेल शहर पोलीस ठाणे, श्री. प्रविण भगत गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहा. पोलीस निरीक्षक, पनवेल शहर पोलीस ठाणे, श्री. प्रकाश पवार, पोना/३२९५ मिथुन भोसले, नेमणुक पनवेल शहर पोलीस ठाणे, पोशि/४०३३ किरण कराड, नेमणुक पनवेल शहर पोलीस ठाणे, राजस्थान येथील जिल्हा विशेष पथकाचे (DTS) अधिकारी व अमलदार, एएसआय/बहादुर सिंग, कॉन्स्टेबल धारासिंग मिना, कॉन्स्टेबल धनसिंग मिना याच्या पथकाने केली आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

[avatar]