पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या..

-

पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या..

 

परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांची बृहन्मुंबई तर रश्मी नांदेडकर यांची नागपूर ते नवी मुंबई बदली करण्यात आली आहे.

 

नवी मुंबई — राज्य पोलिस सेवेतील पोलिस उपायुक्त तथा पोलिस अधीक्षक दर्जाच्या १६ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश गृह विभागाकडून मंगळवारी (ता. ६) काढण्यात आले. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांची बृहन्मुंबई येथे तर राज्य गुप्तवार्ता विभाग उपायुक्त रश्मी नांदेडकर यांची नवी मुंबई पोलिस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

 

अनुसार, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, यांनी मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण/न्यायालय यांचे आदेश, निवडणुकीची आदर्श आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था, इत्यादी लक्षात घेऊन पुढील उचित कार्यवाही करावी असे आदेशानुसार पोलीस उपायुक्त यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांची पोलिस अधीक्षक महामार्ग सुरक्षा पथक याठिकाणी बदली करण्यात आली आहे. तर, गडचिरोली येथील राज्य राखीव पोलिस बलाचे समादेशक विवेक मासाळ यांची पुण्यात पोलिस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

 

राज्यातील अन्य पोलिस उपायुक्त/पोलिस अधीक्षकाचे नाव, विद्यमान आणि कंसात बदलीचे ठिकाण 

 

संदीप पालवे, पोलिस अधीक्षक- एटीएस, छत्रपती संभाजीनगर (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड), संदीप भाजीभाकरे, पोलिस उपायुक्त-लोहमार्ग, मुंबई (राज्य गुप्तवार्ता विभाग, नागपूर), सचिन गुंजाळ, पोलिस उपायुक्त ठाणे शहर (एटीएस, छत्रपती संभाजीनगर), दत्ताराम राठोड, पोलिस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण, अमरावती (अतिरिक्त अधीक्षक, लोहमार्ग नागपूर), विवेक पानसरे, पोलिस उपायुक्त नवी मुंबई (मुंबई), रश्मी नांदेडकर, पोलिस उपायुक्त- राज्य गुप्तवार्ता विभाग (नवी मुंबई), प्रदीप चव्हाण, मुख्य सुरक्षा अधिकारी- सचिवालय मुंबई (पोलिस उपायुक्त मुंबई), मीना मकवाना, पोलिस उपायुक्त- राज्य गुप्तवार्ता विभाग, छत्रपती संभाजीनगर (ठाणे शहर), दत्ता नलावडे, पोलिस उपायुक्त मुंबई (लोहमार्ग, मुंबई), राजू भुजबळ, पोलिस उपायुक्त मुंबई (मुख्य सुरक्षा अधिकारी, सचिवालय, मुंबई), रूपाली दरेकर, पोलिस अधीक्षक – नागरी हक्क संरक्षण, छत्रपती संभाजीनगर (महामार्ग सुरक्षा पथक, छत्रपती संभाजीनगर), अनिता जमादार, पोलिस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, छत्रपती संभाजीनगर (नागरी हक्क संरक्षण, छत्रपती संभाजीनगर), लता फड, पोलिस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक पुणे (पोलिस उपायुक्त- राज्य गुप्तवार्ता विभाग, छत्रपती संभाजीनगर) असे बदली करण्यात आली आहे ला.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

[avatar]