पनवेल परिसरात ट्रॅफिक वार्डनच्या नियुक्त्या..

-

पनवेल परिसरात ट्रॅफिक वार्डनच्या नियुक्त्या..

पालिका आयुक्तांचा निर्णय : 30 वार्डन वाहतूक कोंडी मुक्तीसाठी रस्त्यावर

रवींद्र गायकवाड

पनवेल :– पनवेल शहरासह परिसरातील वाहतूक कोंडी ही नित्याची झाली आहे. मात्र वाहतूक पोलिसांना वाहतूक पोलिसांना अनेक वर्षात यावर कायम स्वरुपी मार्ग काढता आला नाही. अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलीसांनी वाहतूक कोंडीसाठी वार्डनच्या नियुक्तीबाबत पाठपुरावा केला होता. त्यामुळे पनवेल शहर कोंडीमुक्त कऱण्यासाठी पालिका आयुक्तांनी ३० वार्डन मुंबई सूरक्षा रक्षक मंडळाकडून घेत पनवेल पनवेल शहर वाहतूक पोलीस, कळंबोली आणि खारघर वाहतूक पोलिसांच्या हद्दीत नेमणूक केली आहे. त्यामुळे पनवेलकरांची वाहतूक कोंडीतुन सुटका होणार आहे.

 

 

पनवेल शहरातील वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याच्या दृष्टीने पनवेल महानगरपालिकेने ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेतला आहे. याबाबत महासभेची रीतसर मंजुरी देखील घेण्यात आली. मात्र तांत्रिक अडचणीमुळे या वॉर्डनच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. मात्र पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी मुंबई सुरक्षा रक्षक मंडळाकडून 30 वार्डनची मागणी केली होती. त्यानुसार पनवेल महापालिका हद्दीतील पनवेल शहर वाहतूक शाखा यांना 15 वार्डन देण्यात आले, कळंबोली वाहतूक पोलिसांना 8 वार्डन तर खारघर वाहतूक पोलिसांच्या मदतीला 7 वार्डन देण्यात आले आहे. आता वाहतूक पोलिसांच्या मदतीला ट्रॅफिक वार्डन असल्यामुळे वाहतुक कोंडीतुन सुटका होणार आहे.

ही आहेत शहरातील वाहतूक कोंडीचे मुख्य ठिकाणे

शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक, पंचरत्न नाका, उरण नाका, जय भारत नाका, कर्मवीर भाऊराव पुतळा आणि पनवेल बस डेपो या परिसरातील सर्व मार्ग ही वाहतूक कोंडीची ठिकाणे आहेत.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

[avatar]