राष्ट्रवादीत आल्यास जगदीश भाईंचा मान सन्मान निश्चित राखला जाईल – महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

-

राष्ट्रवादीत आल्यास जगदीश भाईंचा मान सन्मान निश्चित राखला जाईल – महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

 

 

भाई जगदीश गायकवाड यांनी रोडपाली येथील आपल्या निवास्थानी आमदार तथा विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा जाहीर सत्कार आयोजित केला होतो

 

 

पनवेल/दिनांक २९ प्रतिनिधी — राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार)गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी दोन दिवसांपुर्वीच बिनविरोध निवड झाली. त्यानिमित्त भाई जगदीश गायकवाड यांनी रोडपाली येथील आपल्या निवास्थानी आमदार तथा विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा जाहीर सत्कार आयोजित केला होतो .यावेळी महाराष्ट्र्र राज्याच्या उपाध्यक्षपदी एक मागासवर्गीय घरातील नवबौद्ध घरातील कार्यकर्त्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ,एकनाथजी शिंदे यांनी एवढ्या मोठ्या पदावर नियुक्ती केल्याबाबद्दल युतीच्या सर्वच घटकांचे आभार मानतो कालच निवड झाली आणि आज जगदीश भाई गायकवाड यांनी माझा पहिलाच सत्कार समारंभ आयोजित केला आहे मी जगदीश गायकवाड़ यांच्या पाठीशी नेहमीच राहीन , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यास निश्चितच जगदीश भाईंचा मान सन्मान राखला जाईल असे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी यावेळी केले.

 

पिंपरी चिंचवड मतदार संघातून मी तिसऱ्यांदा आमदार झालो माझे नेते मार्गदर्शक अजित दादा पवार यांनी माझ्यावर विश्वास टाकत महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा उपाध्यक्ष पदी निवड केली महायुतीच्या राज्यात सर्वसामान्य बौद्ध व्यक्तीला पहिल्यांदाच विधानसभा उपाध्यक्ष पदाची संधी दिली आहे या संधीचा समाजाच्या सेवेसाठी निश्चितच उपयोग करिन असेही अण्णा बनसोडे यांनी यावेळी सांगितले.

 

यावेळी दलित बहुज चळवळीत नेते जगदीश गायकवाड यांनी आपल्या मनोगतात आज सार्वधिक आनंद आला असून गेली तीन टर्म माझे मित्र आमदार अण्णा बनसोडे यांची राज्याच्या प्रमुख असलेल्या पदापैकी दुसरे म्हणजेच महाराष्ट्र राज्याच्या विधान सभा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याचे कळताच अण्णाचा सत्कार करण्याचे आयोजन केले अण्णा माझ्या विनंतीला मान देऊन आल्याबद्दल त्याचे आभार व्यक्त करतो ,अण्णा खुर्चीत नुसते बसून नाही तर सर्वसामान्य जनतेत जाऊन काम करणारे नेते आहेत ,अजितदादांनी अण्णा ची निवड केली म्हणजे अजितदादांनी अण्णांमधील गुण आणि काम पारखून निवड केली आहे.अण्णा नि राष्ट्रवादी चे दरवाजे माझ्यासाठी खुले केलें आहेत अण्णा माझे बॉस आहेत मी राष्ट्र्रवादीत जायचे कि नाही ते येत्या चार मे ला अण्णा च्या वाढदिवशी ठरवू अण्णा माझ्या गळ्यात जी माळ घालतील ती मी स्वीकारेल असे भाई जगदीश गायकवाड यांनी आपल्या भाषणात सांगितले.अण्णा चे काम उल्लेखनीय आहे त्यांच्या कामाची दखल विरोधी पक्ष देखील घेत आहे ,अण्णा आपल्या पदाचा सर्वसामान्य जनतेसाठी निश्चितच उपयोग करतील यात माझ्या मनात तिळमात्र शंका नाही असे जगदीश भाई गायकवाड यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.

 

यावेळी पनवेल महानगर पालिका माजी शिक्षण सभापती विद्या गायकवाड, रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष कविता गायकवाड, रिपाई नेते अमोल गायकवाड, गौतम पाटेकर, किशोर बाबरे यांच्या सह भाई जगदीश गायकवाड यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

[avatar]