उरणच्या विद्यमान आमदारांच्या भाजप पक्षाला खिंडार : तूप गावातील भाजपचे कार्यकर्ते “शेकापक्षात”..

-

उरणच्या विद्यमान आमदारांच्या भाजप पक्षाला खिंडार : तूप गावातील भाजपचे कार्यकर्ते “शेकापक्षात”..

 

 

प्रितम जे एम म्हात्रे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला

 

 

 

उरण दि १३ (विठ्ठल ममताबादे) — उरण विधानसभा मतदारसंघाचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तूपगावातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी शेकापमध्ये जाहीर प्रवेश केला.

 

प्रीतम म्हात्रे यांच्या प्रचाराने वेग घेतला आहे. ठीक ठिकाणी त्यांच्या प्रचाराच्या रॅलीचे स्वागत केले जात आहे. प्रीतम जे एम म्हात्रे यांना विजयी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इतर पक्षातून शेकापमध्ये जाहीर प्रवेश केला जात आहे. तूपगावातील भाजपचे कार्यकर्ता सचिन साळवी (अध्यक्ष कुंभार समाज), निखिल साळवी, प्रतिक साळवी, प्रथमेश साळवी, नंदकुमार साळवी, सुमित महप्रलकर, किशोर कुंभार, सुरेंद्र कुंभार, सिद्धेश थळकर, गणेश ठाकरे, सनी ठाकरे,सुनिल कांबळे, संदेश साळवी यांनी प्रितम जे एम म्हात्रे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

[avatar]