प्रशांत दादा ठाकूर चौथ्यांदा नक्कीच निवडून येणार! 

-

प्रशांत दादा ठाकूर चौथ्यांदा नक्कीच निवडून येणार –  रायगड जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे

 

शिंदे गटाचे रायगड जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांनी केली भूमिका स्पष्ट

 

प्रशांत ठाकूर यांच्यासाठी आता पनवेल मधील शिंदे गट देखील सर्व शक्तीनिशी पुढे सरसावला आहेत 

 

पनवेल विधानसभा मतदारसंघात चौथ्यांदा उभे असलेले असलेले प्रशांत ठाकूर यांच्यासाठी आता पनवेल मधील शिंदे गट देखील सर्व शक्तीनिशी पुढे सरसावला आहे शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांनी नुकतेच पत्रकार परिषद घेऊन प्रशांत ठाकूर यांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे दिले.

 

या पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी आपण युतीधर्म तंतोतंत पाळल्याचा पुनरुच्चार केला. आमचे नेते शिंदे यांनी सर्वसामान्य लोकांशी नाळ तर जोडलीच मात्र कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी केले नाही असे सक्षम नेतृत्व कार्य आणि योजना केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समर्थपणे राबवून दाखवल्या असे ते यावेळी म्हणाले.

 

पनवेल भाजपचे नेते प्रशांत दादा ठाकूर हे चौथ्यांदा शंभर टक्के निवडून येणार असा विश्वास यावेळी शिंदे गटाचे रायगड जिल्हा प्रमुख प्रशांत शेवाळे यांनी बोलून दाखवला. आपला नवरदेव असेल तर आपण सर्व तयारी करतोच पण तोच जर दुसऱ्यांचा असेल तर त्याच्यासाठी प्रयत्न करताना काही फरक पडणारच… अशा शब्दात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली मात्र आमचे कार्यकर्ते प्रशांत ठाकूर यांच्यासाठी सर्व जोमाने प्रयत्नशील असल्याचे देखील वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

[avatar]