कळंबोली चेक पोस्ट येथे तपास कारवाईमध्ये दोन लाख रुपयांची रोकड जप्त 

-

कळंबोली चेक पोस्ट येथे तपास कारवाईमध्ये दोन लाख रुपयांची रोकड जप्त 

 

१८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली 

 

पनवेल दि. ०८ (वार्ताहर) — विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. पनवेल १८८ विधानसभा मतदारसंघ, निवडणूक विभाग अंतर्गत आचारसंहिता पथकांतर्गत वायूवेग पथक क्र. ०३ मोटार वाहन निरिक्षक दिलिप दराडे यांनी मुंबई पुणे हायवे रोडवरून खारघर कडून कळंबोली कडे जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या टोयाटो इनोव्हा चार चाकी संक्षयास्पद वाटल्याने गाडी अडवून सदर गाडीची तपासणी केली असता, त्या गाडीमध्ये २ लाखाची रोख रक्कम आढळून आली. सदरील रक्कम जप्त करण्यात आली. सदर कारवाई १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

या कारवाई वेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय पाटील, आचारसंहिता पथक प्रमुख भारत राठोड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संदिप कराड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय भालेराव, सहाय्यक खर्च निरिक्षक विजय फासे, सहाय्यक खर्च निरिक्षक संजय आपटे, आचारसंहिता पथक प्रमुख महेश पांढरे, आचार संनियंत्रण अधिकारी शरद गिते, आचारसंहिता पथक सहाय्यक प्रमुखजी. एस. बहिरम, सहा. समन्वयक आचारसंहिता कक्ष दिनेश भोसले, तुषार म्हात्रे, नितेश चिमणे, आशा डोळस, तसेच वायूवेग पथक क्र. ०३ मोटार वाहन निरिक्षक दिलिप दराडे, स्थिर सर्वेक्षण पथक क्र.१२ पथकाचे प्रमुख प्रशांत वायचळ, सहा. पथक प्रमुख, अशोक कुमार, कमोठे पोलीस ठाण्याचे पो.शि. गणपती पाटील, खारघर पोलीस ठाण्याचे पो.शि. भूषण चौधरी उपस्थित होते.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

[avatar]