नवी मुंबईतील 22 पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या..

-

नवी मुंबईतील 22 पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या..

 

राज्य पोलीस दलातील मुंबई, नवी मुंबई, मिरा भाईंदर आणि वसई विरारा पोलीस आयुक्तायातील 263 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या 

 

निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या पत्राच्या अनुषंगाने बदली पात्र असलेल्या पोलीस निरीक्षकांच्या या बदल्या करण्यात आल्या

 

रवींद्र गायकवाड 

 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलीस दलातील मुंबई, नवी मुंबई, मिरा भाईंदर आणि वसई विरारा पोलीस आयुक्तायातील 221 तर उर्वरित पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा अधिक्षक कार्यालयातील 42 अशा एकूण 263 पोलीस निरीक्षकांच्या बुधवारी निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या पत्राच्या अनुषंगाने बदली पात्र असलेल्या पोलीस निरीक्षकांच्या या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील 22 पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे.

 

ऐन निवडणुकीच्या नवी मुंबई पोलीस दलातील 22 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सलग आठ वर्षापेक्षा अधिक काळ नवी मुंबईत सेवा केलेल्या पोलीस निरीक्षकांच्या निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. यापूर्वी देखील निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आता 245 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे निवडणुकीच्या कामावर होणार परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या निवडणुकीचा हंगाम सुरू असल्याने या बदल्या केल्यामुळे नवीन पोलीस निरीक्षक यांना प्रक्रिया समजून घेण्यासच निवडणुकीचा काळ देखील संपून जाईल. लोकसभेवेळी राज्य सरकारने सूचना पाळल्या नसल्याने निवडणूक आयोगाने सुनावले होते. लोकसभा निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाने राज्य सरकारला अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या अनुषंगाने सूचना दिल्या होत्या. त्या सूचना राज्य सरकारने पाळल्या नव्हत्या. त्यामुळे काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांच्या घोषणा करण्यापूर्वी राज्य सरकारला खडे बोल सुनावले होते. बदल्या केल्या नाहीत, त्यामुळे आयोगाने नाराजी व्यक्त केली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्टासह इतर 4 राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले होते. या पत्रात 3 वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करा, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र, राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे काही दिवसांपूर्वी आयोगाने राज्य सरकारवर ताषेरे ओढले होते. त्यामुळे बुधवारी पोलीस महासंचालक आस्थापना विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम. मिल्कार्जन्न प्रसन्ना यांनी हे बदलीचे आदेश काढले.

 

बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे..

 

श्रीकांत धरणे —        नवी मुंबई ते मुंबई शहर

 

अजय कांबळे –          नवी मुंबई ते मुंबई शहर

 

अविनाश काळदाते —     नवी मुंबई ते मुंबई शहर

 

तानाजी भगत —           नवी मुंबई ते मुंबई शहर

 

प्रमोद तोरडमोल            नवी मुंबई ते मुंबई शहर

 

सुधाकर ठाणे               नवी मुंबई ते मुंबई शहर

 

प्रकाश सपकाळ          नवी मुंबई ते मुंबई शहर

 

माणिक नलावडे          नवी मुंबई ते मुंबई शहर

 

अनिल पाटील –          नवी मुंबई ते मुंबई शहर

 

सुनील कदम           नवी मुंबई ते मुंबई शहर

 

गिरधर गोरे           नवी मुंबई शहर ते मुंबई शहर

 

अनिल पाटील        नवी मुंबई ते मुंबई शहर

 

चंद्रकांत लांडगे        नवी मुंबई ते मुंबई शहर

 

अंजूम बागवान        नवी मुंबई ते मुंबई शहर

 

देवेंद्र पोळ          नवी मुंबई ते मुंबई शहर

 

वैशाली गलांडे       नवी मुंबई ते मुंबई शहर

 

संजय नाळे          नवी मुंबई ते मुंबई शहर

 

महेश पाटील        नवी मुंबई ते मुंबई शहर

 

संजय जोशी        नवी मुंबई ते मुंबई शहर

 

संजय चव्हाण         नवी मुंबई ते मुंबई शहर

 

जगदीश शेलार         नवी मुंबई ते मुंबई शहर

 

सुनील शिंदे             नवी मुंबई ते मुंबई शहर

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

[avatar]