आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पनवेल शहर पोलिसांचा रुट मार्च

-

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पनवेल शहर पोलिसांचा रुट मार्च

 

पनवेल शहर, करंजाडे वसाहत परिसरात सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला रुट मार्च

 

मतदान केंद्रे, संवेदनशील निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाची ठिकाणी येथे पायी भेटी देवून तेथील परिस्थितीची माहिती घेण्यात आली

 

पनवेल, दि.21 (संजय कदम) — आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या मार्फत एरिया डॉमिनेशन आणि रुट मार्च पनवेल शहरात तसेच करंजाडे वसाहत परिसरात सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला.

 

पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांच्यासह सीआयएसएफचे अधिकारी व कर्मचारी, जवान, आदींच्या पथकाने पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महत्वाची मतदान केंद्रे, संवेदनशील परिसर, संमिश्र वस्ती तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाची ठिकाणी येथे पायी भेटी देवून तेथील परिसराची व परिस्थितीची माहिती घेण्यात आली. त्याचप्रमाणे मतदान करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. अशाच प्रकारे करंजाडे वसाहतीमध्ये सुद्धा पायी भेटी देवून परिसराची माहिती घेण्यात आली तसेच मतदानासाठी जनजागृती करण्यात आली. यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांसह पोलीस पाटील आदी सहभागी झाले होते.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

[avatar]