पनवेलसह नवी मुंबई व दिल्ली परिसरात गंभीर गुन्हे करून धुमाकूळ घालणाऱ्या आंतरराज्यीय सराईत टोळीला मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेने गजाआड..

-

पनवेलसह नवी मुंबई व दिल्ली परिसरात गंभीर गुन्हे करून धुमाकूळ घालणाऱ्या आंतरराज्यीय सराईत टोळीला मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेने गजाआड..

 

लाखो रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत करून 10 गुन्हे उघडकीसआणले आहेत

 

पनवेल/प्रतिनिधी — दोन अज्ञात इसमांनी महिलेच्या गळयातील 18 ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र जबरीने हिसकावून काळया रंगाची केटीएम मोटार सायकलवरुन पळून गेल्याची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्याचप्रमाणे सीबीडी, खारघर, पनवेल शहर, कळंबोली, नेरूळ, वाशी, सानपाडा व कामोठे परिसरात देखील अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. याबाबतच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल होताच पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, पोलीस सह.आयुक्त संजय ऐनपुरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दिपक बाकोरे, पोलीस उपायुक्त अमित काळे आदींनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये महिला संबंधिच्या गुन्हयांना प्रतिबंध करणे व रस्त्यावर घडणार्‍या गुन्ह्यांवर प्राधान्य आणण्यासंदर्भात गुन्हे प्रकटीकरण शाखेला सुचना केल्या.

 

 

त्यानुसार सहा.पोलीस आयुक्त गुन्हे शाखा अजय लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि मध्यवर्ती कक्ष सुनील शिंदे यांच्यासह सपोनि श्रीनिवास तुंगेनवार, सपोनि सतिश भोसले, सपोनि महेश जाधव, सपोनि निलम पचार, पोउपनि राहूल भदाणे, सहा. पोलीस उपनिरीक्षक मंगेश वाट, पोहवा शशिकांत शेंडगे, मपोहवा उर्मिला बोराडे, पोहवा अनिल यादव, पोहवा संजय राणे, पोहवा महेश पाटील, पोना सचिन टिके, पोना निलेश किंद्र, पोना राहूल वाघ, पोना अजय कदम, पोना महेश अहिरे, पोना सतिश चव्हाण, पोना नितिन परोडवाड आदींच्या पथकाने घटनास्थळी भेटी देवून समांतर तपास करुन मोटर सायकल चोरी व चैन स्नॅचिंग उघडकीस आणणे करीता सुमारे एक आठवडा तांत्रिक तपास करून उलवे परिसरातून पाहिजे आरोपींचे छायाचित्र प्राप्त करून उलवे परिसरातील 40 ते 45 सोसायटया व गेस्ट हाउस तपासून आरोपी सागर जुगेश मेहरा (27), अभय सुनिलकुमार नैन (19), शिखा सागर मेहरा (27), अनुज विरसींग छारी (24) आदींना वेगवेगळ्या ठिकाणावरुन या पथकाने ताब्यात घेतले असता त्यांचेकडुन नवी मुंबई परिसरात जबरी चोरीचे 07 गुन्हे, वाहन चोरीचे 02 गुन्हे व दिल्ली येथील 1 गुन्हा असे एकुण 10 गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच आरोपी कमांक 1 याचेविरूध्द दिल्ली येथे 37 गुन्हे दाखल असुन 1 गुन्हयात पाहिजे आरोपी आहे व त्याचेविरूध्द मा. न्यायालयाने 4 गुन्हयात जाहिरनामे प्रसिध्द केले आहेत. या आरोपींकडून आतापर्यंत 1 सोन्याचे मंगळसुत्र, 3 सोन्याच्या चैन, 2 तुटलेल्या सोन्याच्या चैनचे तुकडे असे एकुण 66 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 2 केटीएम मोटार सायकल असा एकुण किंमत 7,70,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हसतगत करण्यात आला आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

[avatar]