नवी मुंबईचा पोलिस आयुक्त बोलतोय..

-

नवी मुंबईचा पोलिस आयुक्त बोलतोय…’, पुण्याच्या तरुणाची फसवणूक, १० लाख उकळले

 

मनी लॉन्ड्रिंगबाबत चौकशी करण्याच्या बहाण्याने या तरुणाकडून १० लाख रुपये उकळण्यात आले

 

याप्रकरणी ३ व्यक्तींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

नवी मुंबईचे पोलिस आयुक्त यांचे नाव वापरून पुण्यातील तरुणाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मनी लॉन्ड्रिंगबाबत चौकशी करण्याच्या बहाण्याने या तरुणाकडून १० लाख रुपये उकळण्यात आले. नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांचे नाव आणि खोटे कागदपत्र दाखवत ही फसवणूक करण्यात आली आहे. फसवणूक झालेल्या २५ वर्षीय तरुणाने विश्रामबाग पोलिस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली. याप्रकरणी ३ व्यक्तींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार ३ जूनपासून ३ ऑगस्ट दरम्यान घडला आहे. फिर्यादीला मुंबईतील फेडेक्स कुरिअर कंपनीमधून मुंबई क्राईम ब्रांचचे अधिकारी मिलिंद भारंबे बोलतोय असा एक फोन आला होता. फिर्यादीला खोटे सांगून त्याने इराणला कुठले पार्सल पाठवले आहे अशी विचारणा केली. यासंदर्भात आरोपींनी काही खोटी कागदपत्रे दाखवून आणि मुंबई पोलिसमध्ये काम करीत असल्याचे ओळखपत्र पाठवून फिर्यादीला धमकावले मुंबईमधून इरानला फेडेक्स पार्सल जे पाठवलं आहे ते सगळं ‘क्लिअर’ करायचे असेल आणि एनओसी मिळवायची असेल तर पैसे दे असे फिर्यादीला धमकावण्यात आले. फिर्यादीची सर्व बँक खात्याची माहिती घेऊन मनी लाँड्रींगबाबत चौकशी करण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून १० लाख रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. दरम्यान, याआधी देखील पुण्यातील अनेक तरुण-तरुणींची फसवणूक करण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. फेब्रुवारीमध्ये पोलिस असल्याचा बनाव करून पती-पत्नीला लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. पुण्यातील कोंढवा परिसरातील ही घटना होती. परदेशी चलनासह ४ लाख ७९ हजार रुपये घेऊन आरोपी फरार झाले होते. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करणयात आला होता.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

[avatar]