आरोपीचा दीडशे किलोमीटर पाठलाग आणि अखेर मध्य प्रदेशात अटक

-

आरोपीचा दीडशे किलोमीटर पाठलाग आणि अखेर मध्य प्रदेशात अटक

 

आरोपी हा नवी मुंबई, मुंबई, ठाणे, नाशिक परिसरात गुन्हे करून परराज्यात पळायचा 

 

पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर हिर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई 

 

मुंबई/प्रतिनिधी — विक्रोळी पोलिसांच्या हद्दीतील भांडूप पेट्रोलपंपाजवळ पूर्व द्रुतगती मार्गावर एका ३९ वर्षीय दुचाकीस्वाराची सोनसाखळी चोरून तो ठाण्याच्या दिशेने पळाला होता. या घटनेनंतर पोलीस उपायुक्त (परिमंडळ-७) पुरुषोत्तम कराड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर हिर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील क्षीरसागर व गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शंकर पाटील, पंकज पाटील यांची वेगवेगळी पथके तयार करून संबंधीत गुन्ह्याचा तपास सुरू केला.

 

तपास पथकाने घटना स्थळापासून सीसीटीव्ही पाहण्यास सुरुवात केली असता गुन्ह्यातील आरोपी हा मोटारसायकल वरून ठाण्याच्या दिशेने गेल्याचे दिसून आले. त्यानुसार त्या मोटर सायकलचा माग काढण्यासाठी पोलीस पथकाने ठाणे पोलिस आयुक्तालयातील व कल्याण परिसरातील शासकीय व खासगी असे साधारण ७५ सीसीटीव्ही कॅमेरांचे चित्रण तपासले. आरोपी आंबिवली मध्ये गेल्याचे दिसले. तपासणीत तो सराईत आरोपी मोहम्मद सय्यद असल्याचे पोलिसांना समजले.

 

त्यानंतर आरोपीचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. मोहम्मद सय्यद हा मुंबई, नवी मुंबई, ठाणे व नाशिक परिसरात सलग काही दिवस गुन्हे करुन परराज्यात जातो. त्यानंतर तांत्रिक तपासात आरोपी मध्यप्रदेश येथे गेला असल्याचे समजले. त्यानुसार पोलीस पथक तात्काळ मध्य प्रदेशात रवाना झाले. मध्यप्रदेशमध्ये आरोपीचा शोध घेत असताना आरोपी भोपाळहून उतरप्रदेशला राष्ट्रीय महामार्ग ४५ मार्गे जात असल्याचे समजले. त्यानुसार एनएच ४५ या महामार्गावर साधारण १५० किलोमीटर आरोपीचा पाठलाग करुन त्यास हर्षिली टोल प्लाज़ा येथे शिताफीने मोहम्मद कबीरशहा सय्यद ऊर्फ सलमान (३२) याला पकडण्यात आले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

[avatar]