नवी मुंबई पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

-

नवी मुंबई पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या..

 

मुदत संपल्यामुळे अनेक पोलीस अधिकार्‍यांच्या करण्यात आल्या बदल्या

 

पनवेल, दि.14 (संजय कदम) —  परिमंडळ 1 व परिमंडळ 2 अंतर्गत अनेक पोलीस अधिकार्‍यांच्या पोलिसी सेवेच्या मुदत संपल्याने त्यांच्या तात्काळ बदल्या करण्यात आल्या आहेत.

 

त्यामध्ये नेरुळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांची पनवेल शहर पोलीस ठाणे येथे बदली करण्यात आली आहे. तर रबाळे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नायकवडी यांची नेरुळ पोलीस ठाणे येथे बदली करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांची वाशी पोलीस ठाणे येथे बदली करण्यात आली आहे. रबाळे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे यांची खारघर पोलीस ठाणे येथे बदली करण्यात आली आहे. यातील काही अधिकार्‍यांनी तात्काळ पदभार स्वीकारला आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

[avatar]