Panvel traffic :– पनवेल रेल्वेस्थानकात वाहतूक कोंडी..

-

Panvel traffic :– पनवेल रेल्वेस्थानकात वाहतूक कोंडी..

 

 

पनवेल शहर वाहतूक पोलीस व मदतनिस यांचे दुर्लक्ष

 

 

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे

 

 

रवींद्र गायकवाड 

 

 

भाग – 1

 

पनवेल :– पनवेल रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारांवर तीन आसनी रिक्षाचालकांची मुजोरी पाहायला मिळते आहे. रिक्षा चालकांच्या नियोजन शून्यमुळे सोमवारी 8 जुलै रोजी त्याठिकाणी असणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या समोर वाहतूक कोंडी झाली मात्र वाहतूक पोलीस मोबाईलमध्ये वस्त असल्याने वाहतूक कोंडीबाबत काहीही घेणेदेणे नसल्याचे समोर आले आहे. याबाबत सर्वसामान्य वाहन चालक हैराण झाल्याचे पहायला मिळाले. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

 

 

 

पनवेल रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत जाणे प्रवाशांना अडचणीचे आहे. 15 मीटर रस्ता असताना प्रवाशांना पायी स्थानक परिसरात जाणे शक्य होत नाही. या रस्त्यावर तीन आसनी रिक्षाचालकांची मोठी गर्दी असते. एक, दोन नव्हे तर तीन वेगवेगळ्या रांगा लावून रिक्षाचालक उभे असतात. मात्र रेल्वे प्रशासनाच्या मालकीची जागा असल्यामुळे वाहतूक कोंडीमुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांचे हाल होत होते. याबाबत लोहमार्ग पोलिसांकडेही याची जबाबदारी नाही आणि रेल्वे प्रशासनाकडून कठोर भूमिका घेतली जात नसल्याने तीन आसनी चालकांचे चांगलेच फावले होते. रेल्वेच्या मालकीच्या जागेत रिक्षाचालकांना मज्जाव करून संपूर्ण परिसर मोकळा केला. दररोज कसाबसा रस्ता काढणार्‍या प्रवाशांनी आश्चर्य व्ये केले होते. यावेळी बॅरिकेडस लावून रिक्षाचालकांचा प्रवेश बंद करण्यात आला आहे.

 

याबाबत पनवेल रेल्वे स्थानक परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये या करिता पनवेल शहर वाहतूक पोलिसांकडून वाहतूक पोलिसांची नेमणूक केली जाते. व त्याठिकाणी नेमणूक केलेल्या वाहतूक पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरात वाहतूक कोंडी होणार नाही यांची दक्षता घेणे गरजेचे आहे. मात्र त्याठिकाणी नेमलेले वाहतूक पोलीस समोर वाहतूक कोंडी झालेली असताना देखील मोबाईमध्ये मग्न असल्याचे पाहणी दरम्यान दिसून आले. यावेळी त्या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या वाहतूक धारक हैराण झाले होते. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी वाहन चालकांकडून करण्यात येत आहे*.

 

काही वेळात वाहतूक पोलीस गायब होतात तेव्हा..

 

 

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून एखाद्या ठिकाणी नेमणूक केलेल्या ठिकाणी दिलेल्या वेळेत योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात सोमवारी 8 जुलै रोजी नेमणूक केलेले कर्मचारी वाहतूक कोंडी, कारवाई करण्याऐवजी काही वेळ मोबाईमध्ये मग्न राहून त्यानंतर त्यांच्या जोडीला असलेले वार्डन सदस्य यांच्याकडे रेल्वे स्टेशन परिसराची जवाबदारी देऊन ठिकाणाहून निघून गेल्याचे पहायला मिळाले. मात्र यावेळेमध्ये रेल्वे स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी झाली असती किंवा बेकायदेशीर प्रवशी वाहतूक, विनाहेल्मेट वाहन चालकावर वार्डन सदस्य हे कारवाई करतील का ? वाहतूक पोलिसाच्या या भूमिकेमुळे वाहन चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

[avatar]