पनवेल शहर पोलिसांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर ऑल आउट ऑपरेशन राबवून केली मोठी कारवाई

-

पनवेल शहर पोलिसांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर ऑल आउट ऑपरेशन राबवून केली मोठी कारवाई

वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पो.नि.प्रवीण भगत यांच्यासह अधिकारी, पोलीस कर्मचारी यांची कारवाई 

पनवेल दि.२३(संजय कदम) :– पनवेल शहर पोलिसांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर ऑल आउट ऑपरेशन राबवून मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे.

त्यामध्ये प्रामुख्याने रेकॉर्डवरील 24 आरोपी तपासले असता त्यापैकी 19 आरोपी मिळाले, तसेच हिस्ट्रीसिटर तपासले असता 4 मिळून आले, ५ जणांना अजामीपत्र वॉरंट बजावण्यात आले. जामीनपात्र वॉरंट 13 जणांना बजावले , 33 समन्स बजावले, कोप्टा अंतर्गत 51 कारवाई करण्य आली तसेच पनवेल परिसरात राबवण्या आलेल्या, तीन ठिकाणच्या नाकाबंदी दरम्यान 175 वाहने तपासनाय्त आली त्यापैकी.85 मोटर वाहनावर कारवाई करण्यात आली. तसेच 2 वाहनावर 185 प्रमाणे ड्रिंक अँड ड्राईव्ह गुन्हा दाखल करण्यात आला. अंमली पदार्थ जवळ बाळगल्या प्रकरणी 2 ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली तर सेवन केल्या प्रकरणी 6 जणांवर कारवाई करण्यात आली तसेच दारूबंदी अंतर्गत 3 जणांवर कारवाई त्याचप्रमाणे बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी नागरिकावर कारवाई करण्यात अली आहे . सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान व पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांच्यासह इतर अधिकारी, पोलीस कर्मचारी, वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी यात सहभागी झाले होते.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

[avatar]