पोलीस पाटील कुणाल लोंढे यांच्या गाडीची काच फोडली..

-

पोलीस पाटील कुणाल लोंढे यांच्या गाडीची काच फोडली..

पनवेल शहर पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनेची नोंद करण्यात आली 

आरोपीना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी 

पनवेल/प्रतिनिधी — रायगड जिल्हा पोलीस पाटील संघाचे सचिव व करंजाडे पोलीस पाटील कुणाल लोंढे यांच्या चार चाकी गाडीची मागील काच अज्ञात इसमाने फोडल्याची घटना घडली आहे.

गुरुवारी 18 एप्रिल रोजी रात्री कुणाल लोंढे यांनी त्यांची व्हॅगेणार कार mh 46 BZ 4559 ही कार वडघर येथील बुद्धविहार येथे पार्क करून घरी गेले होते. मात्र रात्री पुन्हा पाटील हे हॉस्पिटलला जाण्यासाठी आपल्या कारजवळ आले असता त्यांना सदर गाडीची पाठीमागील काच अज्ञात इसमाने फोडून नुकसान केले असल्याचे निदर्शनास आले. यावेळी लोंढे यांनी तात्काळ पनवेल शहर पोलीस ठाणे गाठत घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना देत गुन्हा नोंद केला आहे. या घडलेल्या घटनेबाबत सर्व सामाजिक क्षेत्रातून तसेच महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध केला जात आहे. आरोपीचा पनवेल शहर पोलीस शोध घेत आहेत.

काही समाजकंटकांनी माझ्या गाडीची काचा फोडण्याची ही दुसरी घटना आहे. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार देऊन घडलेल्या घटनेची नोंद केली आहे. या समाजकंटकांना पोलिसांनी तात्काळ अटक करावी.

कुणाल लोंढे – पोलीस पाटील

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

[avatar]