सीबीडी पोलीस ठाणे येथे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी ओपन जिम..

-

सीबीडी पोलीस ठाणे येथे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी ओपन जिम..

पोलीस आयुक्त यांनी कौतुक करून सिबिडी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांचे मनोबल वाढवले. तसेच त्यांना आरोग्यदायी व तणाव मुक्त जीवनाच्या शुभेच्छा दिल्या

बेलापूर/प्रतिनिधी (संजय कदम) — मिलिंद भारंबे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस आणि नागरिक यांच्यासाठी अनेक वेगवेगळे उपक्रम सुरू सुरू करून आपल्या कामाचा वेगळा ठसा निर्माण केलेला आहे. अशाच एका राज्याच्या पातळीवर पथदर्शक ठरणारा इ.एम सी( मध्यवर्ती मुद्देमाल कक्ष) हा मागील महिन्यामध्ये सुरू केलेला उपक्रम आहे. त्याच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांचे कौतुक करून सदरचा उपक्रम हा संपूर्ण राज्यामध्ये लागू करण्याबाबत पोलीस महासंचालक यांना आदेश केले आहेत.

 

या नवीन संकल्पनेतून पोलिस ठाणे मध्ये व आवारांमध्ये पुराव्या कामे जप्त केलेली गुन्ह्यातील अनेक वाहने धुळखात व कुजलेल्या अवस्थेत पडून होती त्यामुळे पोलीस ठाण्याचा परिसर ही डम्पिंग ग्राउंड सारखा दिसत असे. ही सर्व वाहने आयुक्तांनी सुरू केलेल्या ईएमसी तळोजा येथे एकत्रित ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे सर्व पोलीस ठाण्यांचा आवार आता अगदी स्वच्छ झाला आहे. सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्याच्या आवारामध्येही अनेक वर्षापासून बरीच वाहने धुळखात पडून राहिलेली होती. ती वाहने इएमसी तळोजा येथे जमा केल्यानंतर पोलीस ठाणे आवारातील जागा रिकामी झाली. सदर रिकाम्या झालेल्या जागेचा सदुपयोग करावा या उत्तम हेतूने सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी सह आयुक्त संजय येनपुरे, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक आयुक्त राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सीबीडी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी ओपन जिम सुरू करून सदर जागेचा सदुपयोग केलेला आहे. सदर ओपन जिम साठी नवी मुंबई महानगरपालिकेचे ही सहकार्य लाभले आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस ठाणे आवारातच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी बॅडमिंटन कोर्ट बनवलेले आहे. पोलिसांच्या 24 तास कर्तव्यामुळे त्यांच्या आरोग्याची हेळसांड होते. इच्छा असूनही पोलिसांना वेळेअभावी व्यायामाकडे वळणे कठीण होते त्यातूनच पोलिसांमध्ये तणाव निर्माण होत आहे. सततच्या कामाच्या तणावांमध्ये पोलिसांचे मानसिक आरोग्याचाही प्रश्न उपस्थित होत आहे. अशावेळी पोलिसांना कामाच्या ठिकाणीच मिळालेल्या थोड्या वेळाचा सदुपयोग करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याकरता वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी सुरू केलेल्या ओपन जिम या संकल्पनेचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये कौतुक होत आहे. तसेच तणाव मुक्त होण्यासाठी खेळ खेळणे हे उत्तम साधन असल्याने पोलीस अधिकार व कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेले बॅडमिंटन कोर्ट मुळेही पोलिसांमधील तणाव निश्चितच कमी झाला आहे. ह्यातूनच सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी हे आरोग्यदायी व तणावमुक्त जीवन जगत आहेत. पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे एक कुटुंब झाले असून,सांघिक भावना निर्माण झालेली आहे. सदर ओपन जिमचे उद्घाटन मा. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या शुभहस्ते मा. सह आयुक्त संजय येनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, तिरुपती काकडे सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल गायकवाड,योगेश गावडे इतर अनेक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सीबीडी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत सीबीडी पोलीस ठाणे येथे दिमाकदार सोहळा संपन्न झाला आहे. सीबीडी पोलीस ठाण्याच्या ओपन जिम व बॅडमिंटन कोर्ट या संकल्पनेचे माननीय पोलीस आयुक्त यांनी कौतुक करून पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांचे मनोबल वाढवले. तसेच त्यांना आरोग्यदायी व तणाव मुक्त जीवनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

[avatar]