सण व उत्सव सर्वांनी एकोप्याने व सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून साजरे करावे

-

आगामी सर्व सण व उत्सव सर्वांनी एकोप्याने व सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून साजरे करावे ; वपोनि अनिल पाटील   

पनवेल दि ०८ (संजय कदम ) :– आगामी सर्व सण व उत्सव सर्वांनी एकोप्याने व सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून साजरे करावे असे आवाहन पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि अनिल पाटील यांनी पोलीस ठाणे हद्दीतील पोलिस पाटील यांची मासिक बैठक पनवेल तालुका पोलीस ठाणे, मंथन हॉल, येथे घेतली होती त्यावेळी त्यांनी केले.

या बैठकीत आगामी येणारे सण म्हणजेच गुढीपाडवा, रामनवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती , रमजान ईद, तसेच लोकसभा निवडणूक अनुषंगाने योग्य त्या सूचना वपोनि अनिल पाटील यांनी केल्या त्याचप्रमाणे अवैद्य धंदे, (गावठी दारूची भट्टी, जुगार इ.) भाडेकरू, संशयित इसम वाहने, माहिती देणे, महिला सुरक्षेच्या अनुषंगाने योग्य त्या सूचना व मार्गदर्शन केले, जनसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबतसुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या सूचना दिल्या तसेच सायबर क्राईम, ऑनलाइन फसवणूक इ. बाबत योग्य ते सूचना मार्गदर्शन केले या बैठकीला पोलीस उपनिरीक्षक हर्षद राजपूत, गोपनीय विभागाचे अधिकारी कुवर यांच्यासह 39 पोलिस पाटील उपस्थित होते.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

[avatar]