आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांची महेश साळुंखे यांनी घेतली भेट..

-

आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांची महेश साळुंखे यांनी घेतली भेट..

भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या तयारी विषयी चर्चा करण्यात आली

पनवेल/प्रतिनिधी (संजय कदम) — स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी आगामी सहा डिसेंबर रोजी येणाऱ्या भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या तयारी विषयी चर्चा करण्याकरता आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांची त्यांच्या चेंबूर येथील कार्यालयात जाऊन भेट घेतली.

यापूर्वी त्यांनी एकतावादी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष गंगाराम ईंदिसे यांची सुद्धा याविषयी चर्चा करण्यासाठी भेट घेतली होती. त्याचप्रमाणे या चर्चेमध्ये रायगड जिल्ह्यातील आंबेडकर चळवळीची सध्याची परिस्थिती त्याचबरोबर भविष्यातील रायगड जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी कोणत्या प्रकारची रणनीती आखता येईल याविषयी चर्चा करणार आहेत. महेश साळुंखे हे महाराष्ट्र कार्यरत असणाऱ्या सर्व आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांची वेळोवेळी भेट घेत असतात व आंबेडकरी चळवळ कशी सक्षम करता येईल याविषयी चर्चा करून त्याप्रमाणे कार्यक्रम करीत असतात. सर्व राष्ट्रीय अध्यक्ष यापुढे एकजुटीने आंबेडकरी चळवळ मोठी करण्याकरता प्रयत्न करणार आहेत.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

[avatar]