करंजाडे येथील महिलेचे दागिने चोरणारा आरोपी गजाआड..

-

करंजाडे येथील महिलेचे दागिने चोरणारा आरोपी गजाआड..

पनवेल शहर पोलीस व गुन्हे शाखा कक्ष 2 च्या पथकाची कारवाई

पनवेल/प्रतिनिधी (संजय कदम) – पनवेल जवळील करंजाडे येथे एका महिलेच्या ताब्यात असलेले २ लाख ९० हजार रुपये किमतीचे दागिने लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलीस व गुन्हे शाखा कक्ष २ पनवेल यांनी समांतर तपास करून नेरुळ येथून ताब्यात घेतले आहे.

करंजाडे येथे राहणाऱ्या एका महिलेच्या घरातून विविध प्रकारचे सोन्याचे दागिने ज्याची किंमत जवळपास २ लाख ९० हजार रुपये इतकी आहे ही अज्ञात चोरट्याने चोरल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या संदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोना प्रवीण मेथे, पोहवा अमोल पाटील, पोहवा परेश म्हात्रे व गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलच्या पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेतला असता सदर आरोपी मोहम्मद अजमेरी इब्राहीम खान (वय २६) हा नेरुळ परिसरात असल्याची माहिती मिळण्याने त्याला सापळा रचून ताब्यात घेतले आता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. याबाबत आधीक तपास पोना प्रवीण मेथे करीत आहेत.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

[avatar]